मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price: सोने दरात वाढ, चांदीचा भावही वधारला; तपासा किती वाढला 10 ग्रॅमचा रेट

Gold Price: सोने दरात वाढ, चांदीचा भावही वधारला; तपासा किती वाढला 10 ग्रॅमचा रेट

लग्नसराईच्या दिवसांत सराफा बाजारात आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोने दरात (Gold Price) तेजी आहे. चांदीचा भावही (Silver Price) वधारला आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 22 डिसेंबर : लग्नसराईच्या दिवसांत सराफा बाजारात आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोने दरात (Gold Price) तेजी आहे. चांदीचा भावही (Silver Price) वधारला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज फेब्रुवारी डिलीव्हरी सोन्याच्या दरात 0.04 टक्क्यांची वाढ झाली आहे. चांदी 0.12 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेड करत आहे. काय आहे सोन्याचा दर (Gold Price Today) - फेब्रुवारी डिलीव्हरी सोन्याचा दर आज 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 48,087 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. चांदीचा भाव (Silver Price) - सराफा बाजारात आज चांदीचा दरही वधारला आहे. आज चांदी 0.12 टक्क्यांच्या तेजीसह 61,880 रुपये किलो ट्रेड करत आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने दरात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील पंढरवड्यात दर 49,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रोज 100 रुपये गुंतवा अन् बना करोडपती! गुंतवणुकीची सोपी पद्धत बनवेल श्रीमंत

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर - तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता - जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

पुढील बातम्या