• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • सोन्याचा भाव पोहोचला 46698 रुपयांवर, चांदीचे भावही वधारले

सोन्याचा भाव पोहोचला 46698 रुपयांवर, चांदीचे भावही वधारले

गेल्या काही दिवसांपासून गडगडणारे सोन्याचे आणि चांदीचे भाव (Gold and Silver Prices) वाढायला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची (third week of July) सांगता सोन्याचांदीतील तेजीनं झाली.

 • Share this:
  मुंबई, 23 जुलै : गेल्या काही दिवसांपासून गडगडणारे सोन्याचे आणि चांदीचे भाव (Gold and Silver Prices) वाढायला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची (third week of July) सांगता सोन्याचांदीतील तेजीनं झाली. शेअर बाजारात सोनं आणि चांदी यांचा भाव वधारला (Price gained) आणि चढ्या दरावरच बाजार बंद झाले. सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. जागतिक बाजारातील तेजीसह सराफा बाजारात सोन्याचा भाव 256 रुपयांच्या तेजीसह 46,698 रुपयांवर बंद झाला, तर चांदीच्या भावातही 662 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. चांदीचा सध्याचा बाजारभाव 66,111 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी सोन्याचांदीच्या भावानं उच्चांक गाठल्यानंतर हे भाव काहीसे घसरले होते. मात्र आता पुन्हा एकदा भाव वाढायला सुरुवात झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं चित्र आहे. हे वाचा -70 वर्षापूर्वी खासगी बँकांमधले कोट्यवधी रुपये बुडाले; तरी आता Privatisation का? यामुळे वाढले भाव अमेरिकेत आर्थिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी झाल्यामुळे जगभरात सोनं आणि चांदीचे भाव वाढू लागल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं आहे. आर्थिक गुंतवणुकीवरील परतावा कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार तिथली गुंतवणूक काढून ती सोनं आणि चांदीमध्ये करत असल्याचं चित्र आहे. सोन्यातील गुंतवणूक वाढू लागल्यामुळे त्याची मागणी वाढत आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम सोन्याच्या बाजारभावावर होत आहे. सोन्याच्या दरात वाढ होण्याचा हा सिलसिला पुढचे काही दिवस सुरू राहिल, असा अंदाज अर्थविश्वातून व्यक्त करण्यात येत आहे. सोन्यातील गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असून अल्पावधीत सोन्यातील गुंतवणुकीतून चांगला नफा गुंतवणूकदार मिळवू शकतात, असा अंदाज या क्षेत्रातील विविध तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र कुठल्याही फसव्या सल्ल्याला किंवा अमिषाला बळी न पडता योग्य आर्थिक सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा, असंही सांगण्यात आलं आहे.
  Published by:desk news
  First published: