Home /News /money /

ज्वेलरी दुकानं हळूहळू उघडण्यास सुरुवात, जाणून घ्या मंगळवारचे सोन्याचे भाव

ज्वेलरी दुकानं हळूहळू उघडण्यास सुरुवात, जाणून घ्या मंगळवारचे सोन्याचे भाव

लॉकडाऊन दरम्यान सोन्याची विक्री जरी घटली असली तरीही सोन्याच्या किंमतीमध्ये चढउतार कायम आहे. मंगळवारी देखीली सोन्याच्या किंमतीमध्ये बदल पाहायला मिळाला

    नवी दिल्ली, 12 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संक्रमण रोखण्यासाठी देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याचा कालावधी संपत आला आहे. या दरम्यान सोन्याची विक्री जरी घटली असली तरीही सोन्याच्या किंमतीमध्ये चढउतार कायम आहे. मंगळवारी देखीली सोन्याच्या किंमतीमध्ये बदल पाहायला मिळाला. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये 219 रुपयांची वाढ होऊन सोनं प्रति तोळा 46004  रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 916 रुपयांनी वाढून प्रति तोळा 42139 रुपये झाली आहे. ibjarates.com ने दिलेल्या माहितीनुसार चांदीच्या किंमतीत मात्र प्रति किलो 140 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर चांदी प्रति किलो 43060 रुपयांवर पोहोचली आहे.  सोमवारी चांदीचे दर 43200 रुपये प्रति किलो इतके होते. (हे वाचा-विदेशी कंपन्यांना भारतात आणण्यासाठी मोदी सरकारचा मेगा प्लॅन तयार) देशभरात गेल्या दीड महिन्यांपासून दागिन्यांची दुकानं बंद आहेत. दरम्यान लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये हळूहळू काही ठिकाणी नियम शिथिल होऊ लागल्याने ज्वेलरी दुकानं देखील उघडू लागली आहेत. टाटांचा ज्वेलरी ब्रँड असणाऱ्या तनिष्कने देखील त्यांचे देशभरातील 328 स्टोअर पुन्हा एकदा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा रविवारी 50 दुकानं उघडण्यात आली. ही ज्वेलरीची दुकानं उघडताना सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझिंग या सर्व गोष्टींची खबरदारी घेणं बंधनकारक असणार आहे. तनिष्कने देखील नियमांचे पालन करण्याबाबत शाश्वती दिली आहे. (हे वाचा-पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, पोस्ट ऑफिसमध्ये देखील होईल काम) दरम्यान सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यासांठी मोदी सरकारकडून एक सुवर्णसंधी देण्यात येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार आहे.  11 मे ते 15 मेपर्यंत असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वस्त सोनेखरेदी करता येणार आहे.  याकरता प्रति ग्रॅम सोन्याची किंमत 4,590 रुपये ठरवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेतून तुम्हाला प्रति तोळा 45900 किंमतीने सोने मिळेल.  दुसऱ्या सिरीजमध्ये तुम्ही आजपासून अर्थात 11 मेपासून ते 15 मे दरम्यान गोल्ड सॉव्हरेन बाँड्सचे सब्सक्रिप्शन घेऊ शकता. या बाँडचा हा हप्ता 19 मे रोजी जारी करण्यात येईल. ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति ग्रॅम सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे ऑनलाइन अर्ज करून सोने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम 4,540  रुपयांनी सोने खरेदी करता येईल. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या