नवी दिल्ली, 24 जून: आज सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सातत्याने झालेल्या तेजीनंतर सोन्याच्या दरात (Gold Price Today) गुरुवारी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारच्या तुलनेत काहीशा स्वस्त दराने तुम्ही सोनंखरेदी करू शकता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) ऑगस्ट सोन्याची वायदे किंमत 162 रुपये अर्थात 0.34 टक्क्यांनी कमी होऊन 46,910 रुपये प्रति तोळा झाली आहे. सोन्याचे दर 47000 रुपयांच्या स्तरावरुन खाली आले आहेत. आधीच्या सत्रात बाजार बंद होत असताना सोन्याचे दर 47,072 रुपये प्रति तोळा होते.
याशिवाय मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जुलै चांदीची वायदे किंमत 67,560 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. चांदीमध्ये 372 रुपये अर्थात 0.55 टक्क्यांची घसरण झाली आहे. याआधी चांदीचे दर 67,932 रुपये प्रति किलो होते.
हे वाचा-सर्वोच्च स्तरापेक्षा 8000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ?
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे दर
ग्लोबल मार्केटबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1,777.26 डॉलर प्रति औंस झाली आहे. अमेरिकन सोन्याची वायदे किंमत 0.2 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1,779.50 डॉलर प्रति औंस झाली आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव
24 जून 2021 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव विविध शहरांमध्ये वेगवेगळा आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा भाव 50340 रुपये, चेन्नईमध्ये 48610 रुपये, मुंबईमध्ये 47160 रुपये, कोलकातामध्ये 49210 रुपये तर हैदराबादमध्ये दर 48110 रुपये आहेत.
हे वाचा-जुलैमध्ये 15 दिवस बंद राहतील बँका, कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी
कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today