Gold Price Today : सोन्याचांदीच्या दरात पुन्हा एकदा उसळी, वाचा काय आहेत नवे दर

Gold Price Today : सोन्याचांदीच्या दरात पुन्हा एकदा उसळी, वाचा काय आहेत नवे दर

सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये आज मोठी उसळी पाहायला मिळाली. मंगळावारी सकाळी दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव 275 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जुलै : सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये आज मोठी उसळी पाहायला मिळाली. मंगळावारी सकाळी दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव 275 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. परिणामी बाजार उघडचाना सोन्याच्या किंमती 48,632 रुपये प्रति तोळा होत्या. त्याचप्रमाणे 23 कॅरेट सोन्याचे भाव 274 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. या शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 48,437 रुपये झाले आहेत. त्याचप्रमाणे बाजार उघडताना 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किंमती अनुक्रमे 44,547 रुपये प्रति तोळा आणि 36,474 रुपये प्रति तोळा इतक्या होत्या.

त्याचप्रमाणे बाजार उघडते वेळी चांदीचे भाव तब्बल 739 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. परिणामी आज चांदी प्रति किलो 49,333 रुपयांवर पोहोचली आहे. सोने आणि चांदीचे भाव जवळपास 50 हजारांच्या घरात पोहोचले आहेत.

(हे वाचा-EXCLUSIVE : 'कोरोनानंतरचं अर्थसंकट वाटतं तेवढं गंभीर नाही, GDP घेणार U टर्न')

इंडिया बुलियन अँड असोसिएशनच्या वेबसाइटनुसार या सोन्याच्या किंमती आहेत. या किंमतीमध्ये जीएसटी समाविष्ट नाही आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. याचा परिणाम सोन्याचांदीच्या दरांवर होत आहे.

मोदी सरकारकडून स्वस्त सोने खरेदी करण्याची आणखी एक संधी

मोदी सरकारकडून (Modi Government) स्वस्त सोनं खरेदी करण्याची आणखी एक संधी पुन्हा एकदा तुम्हाला मिळत आहे. हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) खरेदीसाठीचा  चौथा टप्पा 6 जुलै 2020 पासून सुरू झाला आहे.  ही संधी 10 जुलैपर्यंत असणार आहे.

(हे वाचा-अलर्ट! 3 वर्षांनी परतला खतरनाक Android व्हायरस, एका मेसेजमध्येच होईल खातं रिकामं)

यावेळी जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या बाँडची किंमत  (SGB Issue Price) 4,852 रुपये प्रति ग्रॅम आहे. तसंच सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. ऑनलाइन गुंतवणूकदारांसाठी इश्यू प्राइस 4,802 रुपये आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 7, 2020, 5:21 PM IST

ताज्या बातम्या