Home /News /money /

Gold Price Today: सोने दर वधारला, चांदीच्या किमतीतही वाढ; जाणून घ्या आजचा रेट

Gold Price Today: सोने दर वधारला, चांदीच्या किमतीतही वाढ; जाणून घ्या आजचा रेट

आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोनं (Gold Price Today) महागलं आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोने दरात 255 रुपयांची वाढ होऊन 48,431 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

    नवी दिल्ली, 24 जानेवारी : आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोनं (Gold Price Today) महागलं आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोने दरात 255 रुपयांची वाढ होऊन 48,431 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मागील सत्रात सोने दर 48,176 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. रुपयांत झालेल्या घसरणीमुळे सोने दरात वाढ झाली आहे. सोमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 9 पैशांनी घसरला. एचडीएफसी सिक्योरिटीजने (HDFC Securities) दिल्ली सराफा बाजारातील रेट्सबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार, सोमवारी चांदीच्या दरात (Silver Price Today) 80 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव 64,793 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. मागील सत्रात चांदीचा भाव 64,713 रुपये प्रति किलोग्रॅम होता. डॉलरच्या तुलनेत रुपया 74.52 वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,841 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. तर चांदी 24.25 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहे.

    हे वाचा - Ration Card: रेशन कार्ड नसेल तरीही मोफत मिळेल अन्नधान्य, इथे वाचा सर्व प्रक्रिया

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

    हे वाचा - नोकरीदरम्यान करा गुंतवणूक, निवृत्तीपर्यंत बना कोट्यधीश! काय आहे योजना?

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या