Home /News /money /

Gold Price Today: आज पुन्हा उतरलं सोनं, 45000 रुपयांपेक्षा कमी झाले दर

Gold Price Today: आज पुन्हा उतरलं सोनं, 45000 रुपयांपेक्षा कमी झाले दर

Gold Price Today: आंतरराष्ट्रीय स्तरावर दर उतरल्यामुळे भारतीय बाजाराती देखील सोन्याचे दर घसरले आहेत. तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. इथे वाचा आज काय आहेत सोन्याचे दर

    नवी दिल्ली, 22 मार्च: आंतरराष्ट्रीय स्तरावर दर उतरल्यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर (Gold Rates Today) घसरले आहेत. तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आज भारतीय बाजारात सोन्याचे दर 45 हजार प्रति तोळापेक्षाही कमी आहेत. एमसीएक्स (Multi commodity exchange) वर सोन्याचे दर 0.1 टक्क्याने कमी होऊन 44981 प्रति तोळा झाले आहेत. चांदीची वायदे किंमत देखील कमी झाली आहे. चांदीची किंमत 1.4 टक्केने कमी झाली आहे. यानंतर चांदीचे भाव 66,562 प्रति किलोग्राम झाले आहेत. काय आहेत देशभरातील 24 कॅरेट सोन्याचे भाव? (Gold Rates on 22nd March 2021) दिल्ली- 48,380 रुपये प्रति तोळा मुंबई- 44,910 रुपये तोळा चेन्नई- 46,340 रुपये प्रति तोळा कोलकाता- 47,210 रुपये प्रति तोळा (हे वाचा-अलर्ट! या बँकेच्या नावे नोकरी देण्याच्या बहाण्याने दिला जातोय धोका) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर उतरते आहेत. अमेरिकेत सोन्याचे दर 5.07 डॉलरने घसरण झाली आहे. यानंतर या घसरणीनंतर सोन्याचे दर 1,740.26 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात 0.50 डॉलरच्या घसरणीनंतर दर 25.74 डॉलरच्या स्तरावर पोहोचले आहेत. सोन्याचे दर यावर्षात वाढणार तज्ञांच्या मते, पुन्हा एकदा या मौल्यवान धातूच्या किंमतीमध्ये तेजी येऊ शकते. भारतात लग्नसराईच्या काळात होणाऱ्या दागिन्यांच्या खरेदीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींना आता खरेदीला आधार मिळेल. जर सध्याच्या किंमतींवर सोन्यात गुंतवणूक केली गेली तर ती दीर्घ मुदतीत मोठा नफा मिळण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की 2021 मध्ये सोन्याच्या किंमती निश्चितच वाढतील. यावर्षी सोन्याचे दर 63000 प्रति तोळाच्या पातळीवर जातील असा अंदाज आहे. जर असे झाले तर गुंतवणूकदारांना जोरदार नफा मिळण्याची खात्री आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Money, Silver

    पुढील बातम्या