Home /News /money /

Gold Rate Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; दागिने बनवण्यासाठी किती खर्च येईल?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; दागिने बनवण्यासाठी किती खर्च येईल?

Gold Rates TOday: चांदीचा भाव (Silver Rate) 60,383 रुपयांवर उघडला. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत, ज्यामध्ये बहुतेक दागिने बनवले जातात, 46,500 रुपये आहे.

    मुंबई, 22 जून : सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Drop today) आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा (Gold Rate) 10 ग्रॅमचा दर 150 रुपयांनी घसरून 50,764 रुपयांवर आला. तर, चांदीचा भाव (Silver Rate) 60,383 रुपयांवर उघडला. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत, ज्यामध्ये बहुतेक दागिने बनवले जातात, 46,500 रुपये आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, 24 कॅरेटची किंमत आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,764 रुपये झाला. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 50,914 रुपयांवर बंद झाला. आज दर दीडशे रुपयांनी घसरले. 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 50,561 रुपये होती. 22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 46,500 रुपये होती. त्याच वेळी, 18 कॅरेटची किंमत 38,073 रुपयांवर पोहोचली. 14 कॅरेट सोन्याचा दर 29,697 रुपये होता. खिशाला लागणार कात्री? घरगुती गॅसपासून मालमत्तेपर्यंत येत्या 10 दिवसात बदलणार 'हे' 5 नियम सोन्याचा आजचा दर >> सोने (24 कॅरेट)- 50764 रुपये/तोळे >> सोने (23 कॅरेट) - 50561 रुपये/तोळे >> सोने (22 कॅरेट) - 46500 रुपये/तोळे >> सोने (18 कॅरेट) - 38073 रुपये/तोळे >> सोने (14 कॅरेट) -29697 रुपये/तोळे >> चांदी - 60383 रुपये/किलो चांदीचा दर सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर 60,383 रुपये होता. काल चांदीचा दर 61,077 रुपयांवर बंद झाला. आज त्यात 694 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. इन्शुरन्सचा प्रीमियम हप्त्यांमध्ये भरता येणार; काय आहे IRDAI ची योजना? सोन्याचे दर फोनवर मिळवा IBJA सरकारी सुट्टी वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन सोन्याची किरकोळ किंमत जाणून घेऊ शकता. तुम्हाला एसएमएसद्वारे लेटेस्ट दरांची माहिती मिळेल. कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या