Gold Rate Today: सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; सोनं आजही उच्चांकी दरापेक्षा 5156 रुपये स्वस्त
Gold Rate Today: सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; सोनं आजही उच्चांकी दरापेक्षा 5156 रुपये स्वस्त
Gold Rate: 24 कॅरेट सोन्यावर 3 टक्के जीएसटी जोडल्यास त्याचा दर 52499 रुपये होत आहे, तर ज्वेलर्सचा 10 टक्के नफा जोडल्यानंतर सोन्याची किंमत 57749 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचत आहे.
मुंबई, 30 जून : सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घट (Gold Silver Prices drop today) झाली आहे. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate) 51000 आणि चांदीचा भाव (Silver Rate) 60000 पर्यंत खाली आला. आता सोने त्याच्या उच्चांकी दरापेक्षा 5156 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे, तर चांदी दोन वर्षांपूर्वीच्या उच्च दरापेक्षा 16500 रुपयांनी स्वस्त आहे.
इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, 24 कॅरेट शुद्ध सोने सराफा बाजारात 189 रुपयांनी स्वस्त झाले आणि 50,970 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडले. त्याचवेळी चांदीचा भाव 353 रुपयांनी घसरून 59,500 रुपये प्रति किलोवर सुरु झाला.
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून नवी नियम लागू; काय होईल फायदा?
24 कॅरेट सोन्यावर 3 टक्के जीएसटी जोडल्यास त्याचा दर 52499 रुपये होत आहे, तर ज्वेलर्सचा 10 टक्के नफा जोडल्यानंतर सोन्याची किंमत 57749 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचत आहे. जीएसटी जोडल्यानंतर चांदीची किंमत 61285 रुपये प्रति किलो झाली आहे. यामध्ये ज्वेलर्सचा 10 ते 15 टक्के नफा वेगळा आहे. म्हणजेच 10 टक्के नफा घेऊन, ज्वेलर्स तुम्हाला सुमारे 67413 रुपये किलोने देतील.
10 ग्रॅम सोने 29817 रुपयांवर
18 कॅरेट सोन्याचा भाव आता 38228 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 3 टक्के जीएसटीसह त्याची किंमत 39374 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. ज्वेलर्सचा 10% नफा जोडल्यास तो 43312 रुपये होईल. आता 14 कॅरेट सोन्याचा भाव 29817 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. GST सह, ते 30711 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. यावर 10% नफा जोडल्यास तो 33782 रुपये होईल.
GST Council Meeting: दही-पनीरसह अनेक पॅकबंद खाद्यपदार्थांच्या महाग, हॉटेलमध्ये राहण्यासाठीही जास्त पैसे द्यावे लागणार22 आणि 23 कॅरेट सोन्याचा भाव
23 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे तर आज ते 50766 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडले आहे. यावरही 3 टक्के जीएसटी, मेकिंग चार्ज आणि 10 टक्के नफा जोडून तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 57517 रुपये मिळतील. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 46689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला. 3% GST सह, त्याची किंमत 48089 रुपये असेल. यापासून बनवलेल्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्सचा नफा सुमारे 52898 रुपये असेल.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.