Home /News /money /

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण, चांदीही स्वस्त, नवे दर चेक करा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण, चांदीही स्वस्त, नवे दर चेक करा

सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून 5,175 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

    मुंबई, 29 जून : भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट (Gold-Silver Price Drop) झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर (Gold rate today) प्रति दहा ग्रॅम 51025 रुपये आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 51029 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम चार रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. असं असूनही सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून 5,175 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. चांदीचे आजचे दर चांदीचा दर (Silver Rate Today) आज 59691 रुपये प्रति किलोवर उघडला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 60518 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 827 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. Investment Tips: दररोज वाचवा फक्त 200 रूपये अन् व्हा करोडपती! कसं ते जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा वेगाने व्यवहार होत आहे. अमेरिकेत सोने 1.84 डॉलरच्या वाढीसह 1,820.35 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी 0.05 टक्क्यांनी वाढून 20.87 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे. PM Kisan Yojana: 11 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही? येथे करा तक्रार, पैसे होतील जमा मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता. सोन्याची शुद्धता कशी तपासणार? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या