Home /News /money /

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात आज घसरण; स्वस्तात दागिने खरेदी करण्याची संधी

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात आज घसरण; स्वस्तात दागिने खरेदी करण्याची संधी

सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 5,161 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

    मुंबई, 28 जून : सोने-चांदीच्या दरात आज घसरण (Gold Silver Price Drop Today) दिसून आली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर (Gold Rate Today) प्रति दहा ग्रॅम 51039 रुपये आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 51094 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 55 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. मात्र यानंतरही, सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 5,161 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. LPG Cylinder: गृहिणींचं बजेट कोलमडणार! 1 जुलैपासून गॅस सिलेंडर महागणार? आज चांदीचा दर आज चांदीचा दर (Silver Rate Today) 60488 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव 60832 प्रति किलोच्या दराने बंद झाला होता. अशा प्रकारे आज चांदीचा दर प्रतिकिलो 344 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 163 रुपयांनी वाढून 50,812 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. यापूर्वी, सोन्याचा व्यवहार 50604 रुपयांच्या पातळीवर सुरू होता, परंतु लवकरच त्याची मागणी जोरदार वाढली आणि किंमती 200 रुपयांहून अधिक वाढल्या. सोने मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.32 टक्क्यांनी वाढले आहे. एका माशामुळे मच्छिमाराचं नशीब पालटलं; 3 तास चाललेल्या बोलीनंतर एवढा महाग विकला गेला एक मासा जागतिक बाजारपेठेतही भाव वाढले जी 7 (G7 Summit) देशांनी रशियाच्या सोन्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जागतिक बाजारपेठेत त्याचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळेच या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,825.65 डॉलर प्रति औंस होती, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.12 टक्क्यांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत 21.19 डॉलर प्रति औंसवर पोहोचली, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.15 टक्के जास्त आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या