Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत घरसण, वाचा काय आहेत गुरुवारचे दर

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत घरसण, वाचा काय आहेत गुरुवारचे दर

सोन्याच्या किंमती सध्या 47 हजारांपेक्षा जास्त आहेत. स्पॉट आणि वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत रोज बदल होत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) ठप्प झालेला सोने बाजार अनलॉकच्या या टप्प्यामध्ये काही प्रमाणात पुन्हा एकदा सुरू होऊ लागला आहे. एवढ्या दिवसात झालेले नुकसान भरून काढण्याचे लक्ष्य सोने व्यापाऱ्यांसमोर आहे. सोन्याच्या किंमती सध्या 47 हजारांपेक्षा जास्त आहेत. स्पॉट आणि वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत रोज बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीचे भाव वर-खाली होत आहेत. सोन्याच्या स्पॉट किंमतीप्रमाणेच वायदे बाजारातही मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतो. गुरुवारी देखील वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये बदल झाला आहे.

आज वायदे बाजारात सोन्याचे दर काहीसे उतरल्याचं पाहायला मिळालं. एमसीएक्स एक्सचेंजवर 5 ऑगस्ट 2020 च्या सोन्याची किंमत गुरुवारी सकाळी 63 रुपयांनी कमी झाली. परिणामी या सोन्याची किंमत प्रति तोळा 47,275 रुपयांवर पोहोचली आहे. 5 ऑक्टोबरसाठी सोन्याचे भाव सुद्धा आज सकाळी 53 रुपयांनी कमी होत दर प्रति तोळा 47,445 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

वाचा-भारतात या शहरात स्वस्त मिळतंय पेट्रोल, मुंबईपेक्षा प्रति लिटर 19 रुपयांनी दर कमी

वाचा-पोस्टाच्या या योजनेत बँकेच्या FDपेक्षा लवकर दुप्पट होतील पैसे

आंतरराष्ट्रीय स्तरावर गुरुवारी सकाळी स्पॉट आणि वायदा बाजार दोन्ही ठिकाणी सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग मीडिया अहवालानुसार आज सकाळी सोन्याचा वायदा भाव 1736.20 डॉलर प्रति औंस इतका होता. तर सोन्याची स्पॉट किंमतीतही वाढ होऊन ती 1727.29 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

देशांतर्गत बाजारात ज्याप्रमाणे सोन्याच्या किंमती कमी झा्ल्या आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या किंमतीमध्येही आज बदल झाल्याचे दिसले. चांदीच्या किंमती एमसीएक्स एक्सचेंजवर गुरुवारी सकाळी 213 रुपयांनी खाली आल्या. परिणामी गुरुवारी सकाळी चांदीचे दर 48,223 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. स्पॉट आणि वायदे बाजारात याठिकाणी चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

वाचा-LIC ची खास पॉलिसी! एकदा गुंतवणूक करून मिळेल 65 हजारांची पेन्शन, वाचा सविस्तर

संपादन-जान्हवी भाटकर

First published: June 18, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या