Home /News /money /

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमती उतरल्या, इथे वाचा काय आहेत दर

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमती उतरल्या, इथे वाचा काय आहेत दर

लॉकडाऊनमध्ये सोन्याचांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या वायदा किमतीमध्ये घसरण झाली आहे.

    नवी दिल्ली, 15 जून : लॉकडाऊनमध्ये सोन्याचांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या वायदा किमतीमध्ये घसरण झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर 5 ऑगस्ट 2020 च्या वायदा किंमतीमध्ये 0.40 टक्के म्हणजेच 190 रुपयांची घसरण झाल्याचे दिसले. या घसरणीनंतर 5 ऑगस्ट 2020साठी सोन्याची किंमत प्रति तोळा 47,144 रुपयांवर ट्रेंड करत होती. सोन्यापाठोपाठ वायदे बाजारातील चांदीचे दर देखील आज काहीसे उतरले होते. जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यांसाठी चांदीचे दर कमी झाले होते. जुलै 2020 साठी चांदीचे दर 389 रुपयांनी कमी होत चांदी प्रति किलो 47,301 रुपयांवर पोहोचली आहे. तर सप्टेंबरसाठी चांदी 353 रुपयांनी कमी होत 48,175 रुपये प्रति किलोग्राम झाली होती. हे दर सोमवारी सकाळचे दर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती उतरल्या देशांतर्गत वायदा बाजाराबरोबर आंतरराष्ट्रीय वायदा बाजारातही सोमवारी सकाळी सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत देखील उतरली होती. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार सोमवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याची आंतरराष्ट्रीय वायदा किंमत 0.17 टक्क्यांनी कमी झाली होती. 3 डॉलरच्या या घसरणीनंतर सोन्याचा वायदा भाव 1734.30 डॉलर प्रति औंस होता. तर आंतररष्ट्रीय स्तरावर सोन्याची स्पॉट किंमत 1729.02 डॉलर प्रति औंस इतकी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 0.12 डॉलरच्या घसरणीनंतर 17.37 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत आहे. अन्य बातम्या तुम्ही PAN कार्ड संबंधित ही चूक केली आहे? द्यावा लागेल 10,000 रुपयांचा दंड 15 राज्यांसाठी मोदी सरकारची नवीन योजना, 81 कोटी नागरिकांचा होणार फायदा मोठा झटका! दोन आठवड्यांपर्यंत रोज वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या