मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सलग घसरण (Gold Price Today) होत आहे. मागील वर्षीच्या उच्चांकासोबत तुलना केल्यास सोन्याच्या किमतीत 25 टक्क्यांची घट झाली आहे.
नवी दिल्ली 06 मार्च : सोन्याची आणि चांदीच्या दरांमध्ये मागील काही दिवसांपासून सलग घसरण होताना दिसत आहे. लग्नसराई सुरू होण्याआधी सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत सलग घट होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमधील कमजोरीमुळे देशातही सोनं आणि चांदीच्या किमतीत घसरण (Gold and Silver Price) झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्यासाठी ही अगदी सुवर्णसंधी आहे. कारण, सिझन सुरू होताच सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी सोन्याची किंमत 43,887 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. HDFC Securities नुसार मागील आठवड्यात शुक्रवारी म्हणजेच 26 फेब्रुवारीला सोन्याच्या किमती 44,409 इतक्या होत्या. यानंतरच्या आठवड्याच सोन्याच्या किमती 522 रुपयांनी घसरल्या. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सलग घसरण होत आहे.
मागील वर्षी कोरोना संकटादरम्यान लोकांनी सोन्यात भरपूर गुंतवणुक केली. यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचे भाव 56191 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. मागीस वर्षी सोन्यानं 43 टक्के रिटर्न दिला. आता मागील वर्षीच्या उच्चांकासोबत तुलना केल्यास सोन्याच्या किमतीत 25 टक्क्यांची घट झाली आहे. आकडेवारीनुसार पाहिल्यास, ऑगस्ट 2020 च्या तुलनेत 10 ग्रॅम सोन्यामागे किमतीत 12,300 रुपयांची घट किमतीत झाली आहे.
सोन्याशिवाय चांदीच्या किमतीतही घसरण नोंदवली गेली आहे. शुक्रवारी चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. शुक्रवारी सकाळी चांदीची किंमत 66,627 रुपये प्रतिकिलो इतकी होती. मात्र, दिवस संपेपर्यंत किमतीत मोठी घसरण झाली. एकूण 1,822 रुपयांच्या घटीसह चांदीच्या किमती 64,805 रुपये किलोग्रामवर आल्या. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79,980 रुपये प्रतिकिलो आहे. यानुसार चांदीच्या किमतीतही उच्चांकानुसार 15,105 रुपयांची घट आली आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.