नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 26 ऑगस्ट रोजी उतरले आहेत. असे असले तरी प्रति तोळा सोन्याचे दर अद्यापही 46 हजारांपेक्षा जास्त आहेत. चांदीचे दर देखील (Silver Price Today) आज कमी झाले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,414 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदी 61,976 रुपये प्रति किलोवर असताना बाजार बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील आज सोन्याचे दर कमी झाले असून चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) किरकोळ घसरण झाली आहे.
सोन्याचे नवे दर
दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर प्रति तोळा 265 रुपयांनी कमी झाले आहेत. आजच्या घसरणीनंतरही सोन्याचे दर प्रति तोळा 46 हजारांपेक्षा जास्त आहेत. या घसरणीनंतर दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर आज 46,149 रुपये प्रति तोळा आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर दर 1,785 डॉलर प्रति औंसवर आहेत
हे वाचा-ज्येष्ठ नागरिकांसाठी Fixed Deposit चा पर्याय फायद्याचा, GPay वरही काढता येईल FDचांदीचे नवे दर
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली आहे. चांदी 323 रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे चांदीचे दर 61,653 रुपये प्रति किलोवर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर किरकोळ कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदी 23.65 डॉलर प्रति औंसवर आहे.
हे वाचा-Post Office च्या या पॉलिसीमध्ये दरमहा 1300 रुपये गुंतवून मिळवा 13 लाखका उतरले सोन्याचे दर?
एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर कमी-जास्त होत आहेत. न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजवर स्पॉट गोल्डची किंमत उतरली आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारले आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाने आज 13 पैशांच्या मजबुतीसह 74.11 च्या स्तरावर व्यवहाराची सुरुवात केली होती. यामुळे देखील सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढला होता.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.