मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सोने पुन्हा महागले; चांदीच्या किंमतीतही 2000 रुपयांपेक्षा अधिक वाढ, वाचा आजचे दर

सोने पुन्हा महागले; चांदीच्या किंमतीतही 2000 रुपयांपेक्षा अधिक वाढ, वाचा आजचे दर

आज महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 418 रुपये प्रति तोळाने वाढले असून चांदीच्या किंमती प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढल्या आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : गेल्या पंधरवड्यामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये चढउतार पाहायला मिळाला. आज महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. अमेरिकन डॉलर इंडेक्समध्ये (Dollar Index)झालेल्या घसरणीमुळे आणि अमेरिकन बाँडच्या यील्डमध्ये झालेल्या घसरणीमुळे विदेशी बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाल्याचा पाहायला मिळत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 418 रुपये प्रति तोळाने वाढले असून चांदीच्या किंमती प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढल्या आहेत.  तज्ज्ञांच्या मते विकसीत अर्थव्यवस्थांच्या आर्थिक आकडेवारीमध्ये आलेल्या कमजोरीमुळे सोन्याचांदीला मजबुती (Gold Silver Price Today) मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मुल्य घसरल्यामुळे सोन्याच्या किंमती दोन आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. वृत्त संस्था Reuters च्या मते विदेशी बाजारात सोन्याचे दर 1,968.98 (Gold Spot Price) डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. (हे वाचा-SBI देत आहे सर्वात स्वस्त 'Green Car Loan', वाचा काय आहेत फायदे) सोन्याचे नवे भाव (Gold Price on 01 September 2020) एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात  99.9 टक्के शुद्धतेच्या अर्थात 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 52,545 रुपयांवरून वाढून 52,963 रुपये प्रति तोळा झाल्या होत्या. या दरम्यान सोन्याचे दर 418 रुपयांनी वाढले होते. चांदीचे नवे भाव  (Silver Price on  01 September 2020) सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढले आहेत. यानंतर चांदी 72,793 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. (हे वाचा-AGR थकबाकी भरण्याठी टेलिकॉम कंपन्यांना 10 वर्षांची मुदत, SC चा मोठा निर्णय) वायदे बाजारातही महागले सोने एमसीएक्सवर आज ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत 0.7 टक्क्यांनी वाढून 52,000 प्रति तोळावर पोहोचली आहे. सलग तिसऱ्या व्यवहाराच्या सत्रात वायदे किंमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदीची वायदे किंमत 1.2 टक्क्यांनी वाढून 71,000 रुपये प्रति किलो झाली आहे. याआधीच्या सत्रात सोने 300 रुपये प्रति तोळा तर चांदी 1800 रुपये प्रति किलोने वाढली होती.
First published:

Tags: Gold, Gold and silver prices today

पुढील बातम्या