मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर उतरले सोन्याचे दर, चांदीचीही झळाळी उतरली

Gold Price Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर उतरले सोन्याचे दर, चांदीचीही झळाळी उतरली

Gold Rates Today

Gold Rates Today

भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today)आज 18 ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा एकदा घसरले आहेत. आज झालेल्या घसरणीनंतरही सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today)आज 18 ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा एकदा घसरले आहेत. आज झालेल्या घसरणीनंतरही सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत. चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) देखील आज घसरण पाहायला मिळाली असून चांदीचे दर 62 हजार रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,480 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 62,417 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर वाढले असून चांदीचे दर स्थिर आहेत. सोन्याचे नवे दर (Gold Price Today on 18th August 2021) दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 152 रुपये प्रति तोळाची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,328 रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात घसरण होऊनही दर 46 हजारांपेक्षा जास्तच आहेत. भारतीय सराफा बाजारांपेक्षा उलट परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. याठिकाणी सोन्याचे दर वधारले असून दर 1,787 डॉलर प्रति औंसवर आहेत. हे वाचा-Bombay Stock Exchange: शेअर बाजारात मोठी उसळी, आज Sensex ऑल टाइम हायवर चांदीचे नवे दर (Silver Price Today on 18th August 2021) चांदीच्या किंमतीत देखील आज घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी 286 रुपयांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर दर  62,417 रुपये प्रति किलोवर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही आहे. का उतरले सोन्याचे दर हे वाचा-भंगार विकून केली 391 कोटींची कमाई, Indian Railway ची कोरोना काळात झाली चांदी! एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मिळणाऱ्या मिळत्याजुळत्या संकेतांमुळे सोन्याचे दर वरच्या स्तरावरच कमीजास्त होत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते सोन्याचे दर एका आठवड्याच्या सर्वोच्च स्तरावर कायम आहेत, यामध्ये किरकोळ चढउतार सुरू आहे. त्यामुळे आज काही प्रमाणात सोन्याचे दर उतरले आहेत.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

पुढील बातम्या