Home /News /money /

कोरोना काळात सोन्या-चांदीनं गाठला नवा उच्चांक, 60 हजार जाण्याची शक्यता

कोरोना काळात सोन्या-चांदीनं गाठला नवा उच्चांक, 60 हजार जाण्याची शक्यता

यामध्ये आरोपीला त्याच्या वडिलांनीही मदत केल्याची माहिती सांगितली जात आहे. आरोपींनी आधी दुकानाची रेकी केली आणि त्यानंतर दुकानावर धाड मारली. यामध्ये आरोपीला त्याच्या वडिलांनीही मदत केल्याची माहिती सांगितली जात आहे. आरोपींनी आधी दुकानाची रेकी केली आणि त्यानंतर दुकानावर धाड मारली.

यामध्ये आरोपीला त्याच्या वडिलांनीही मदत केल्याची माहिती सांगितली जात आहे. आरोपींनी आधी दुकानाची रेकी केली आणि त्यानंतर दुकानावर धाड मारली. यामध्ये आरोपीला त्याच्या वडिलांनीही मदत केल्याची माहिती सांगितली जात आहे. आरोपींनी आधी दुकानाची रेकी केली आणि त्यानंतर दुकानावर धाड मारली.

16 मार्चपासून सोमवारपर्यंत सोन्याच्या दरात 32 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

    मुंबई, 27 जुलै: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर तेजीनं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सोन्याला झळाळी आली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात तेजी आली. सोमवारी 800 रुपयांनी सोनं महाग झालं असून 51,833 रुपये प्रति तोळा असा दर आहे. जवळपास 1 तोळ्यासाठी ग्राहकांना 52 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडल्यानं वायदा बाजारातही सोनं महाग झालं आहे. सोन्यासोबतच 8 वर्षात प्रथमच चांदीच्या दरानंही उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे 4 तर चांदीचे दर 15 टक्क्यांनी वाढले आहेत. चांदीसाठी किलोग्राममागे ग्राहकांना 64 हजार 617 रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोनाच्या काळात झालेली सर्वात मोठी वाढ असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर 60 हजारपर्यंत जाणार असल्याचं सराफ बाजारातील काही तज्ज्ञांचं मत आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये अशीच वाढ होत राहिली तर सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं आवाक्याबाहेर जाऊ शकतं. हे वाचा-मोठी बातमी! चीनला जबरदस्त झटका, भारत सरकारने आणखी 47 चिनी अ‍ॅप्स केले बॅन सराफ बाजारातील सोन्याचे वाढलेले दर जुलै 2020 अखेरपर्यंत प्रति तोळा 51, 833 हजार जून 2020 - प्रति तोळा 48,410 हजार मे 2020 - प्रति तोळा 47,600 हजार एप्रिल 2020 - प्रति तोळा 41,670 हजार मार्च 2020 - प्रति तोळा 40,200 हजार फेब्रुवारी 2020 - प्रति तोळा 40,240 हजार जानेवारी 2020 - प्रति तोळा 39,200 हजार आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 336 रुपयांनी वधारले असून बाजार उघडताच किंमत 51,039 रुपये होती. 23 कॅरेट सोन्याची किंमत 50,835 तर 22 कॅरेटचा भाव 46,752 आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव 38,279 आहे. 16 मार्चपासून सोमवारपर्यंत सोन्याच्या दरात 32 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Gold, Gold and silver prices today, Money

    पुढील बातम्या