Home /News /money /

Gold-Silver Price Today 8th june: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, Unlock 1.0 च्या पहिल्याच दिवशी असे आहेत दर

Gold-Silver Price Today 8th june: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, Unlock 1.0 च्या पहिल्याच दिवशी असे आहेत दर

सराफा बाजारात आज 22 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे.

    नवी दिल्ली, 08 जून : कोरोनाच्या संकटात (Coronavirus) आजपासून लॉकडाऊन (Lockdown) हटवण्याच्या पहिल्या टप्प्याला म्हणजे अनलॉक-1ला (Unlock-1) सुरुवात झाली. दरम्यान आज पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत घट पाहायला मिळाली. सराफा बाजारात 8 जून म्हणजे सोमवारी 22 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. तर चांदीची झळाळीही कमी झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 296 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. यासह सोन्याचे दर 46 हजार 400 प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर, चांदीच्या दरात 230 रुपयांनी घट होऊन 47 हजार 570 वर आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (ibjarates.com) जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती अशा प्रकारे आहेत. 23 कॅरेट सोनं म्हणजे गोल्ड 995च्या किंमतीतही 295 रुपयांनी घसरण झाली आहे. याचबरोबर 23 कॅरेट सोन्याची किंमत 46 हजार 214 झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 272 रुपयांची घसरून 42 हजार 502 झाली आहे. तर, 18 कॅरेट सोन्याची किंमत 34 हजार 800 झाली झाली आहे. वाचा-सोनं खरेदी करण्यासाठी जातायं? हे महत्त्वाचे नियम पाळायला विसरू नका याआधी एक जून रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 043 होते. तर 2 जून रोजी दर 47 हजार 075 होते. तीन रोजी दर उतरून 46 हजार 875 झाले. तर 4 जून रोजी सोन्याचे दर 46 हजार 767 होते. वाचा-अलर्ट! 30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीत झालेले चढउतार - लॉकडाऊन 1.0 : 25 मार्च ते 14 एप्रिल या 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान एकूण 2,610 रुपये प्रति तोळाने सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या - लॉकडाऊन 2.0 : 15 एप्रिल ते 3 मे दरम्यान असणाऱ्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सोनं एकूण 121 रुपये प्रति तोळाने वधारलं होतं. - लॉकडाऊन 3.0 : 3 मे ते 17 मे दरम्यान लॉकडाऊनचा तिसरा टप्पा होता. या कालावधीमध्ये सोन्याचे दर 1,154 रुपये प्रति तोळाने वाढले होते. याच काळात सोन्याने 47,000 चा टप्पा पार करत नवे रेकॉर्ड रचले होते. - लॉकडाऊन 4.0 : किंमती वाढण्याचा पॅटर्न लॉकडाऊन 4 मध्ये खंडित झाला आहे. या टप्प्यातील 3 दिवसांमध्ये सोने 47 हजारांच्या वर होते. 18 मे रोजी सोन्याच्या किंमती 47,861 रुपये, 20 मे रोजी 47,260 रुपये तर 22 मे रोजी 47,100 रुपये प्रति तोळा इतक्या होत्या. तरी देखील शेवटच्या दिवसापर्यंत सोन्याच्या किंमती 932 रुपये प्रति तोळाने कमी झाल्या आहेत. वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, असे आहेत मुंबईतील दर
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या