नवी दिल्ली, 09 जून: सोन्याचांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या घसरणीनंतर आता सोन्याच्या दरात तेजी आली आहे. मंगळवारी 9 जून रोजी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 0.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. चांदीच्या दराबाबत बोलायचं झालं तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची वाढ झाली आहे. आज एमसीएक्सवर (MCX) ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.10 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे दर 49,174 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. चांदीचे दर 0.22 टक्क्यांच्या वाढीनंतर 71,388 प्रति किलो झाले आहेत.
गेल्यावर्षीपेक्षा 7000 रुपयांनी कमी झालं सोनं
जरी आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरीही हा भाव गेल्यावर्षीच्या सर्वोच्च स्तरापेक्षा जवळपास 7000 रुपयांनी कमी आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.
हे वाचा-स्पेशल FD स्कीम लवकरच संपणार! या चार बँका देतायंत विशेष ऑफर,मिळेल अतिरिक्त व्याज
का वाढतायंत सोन्याचे दर?
अमेरिकन ट्रेजरीची घटणारी कमाई, कमजोर अमेरिकन डॉलर आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट यामुळे चिंता वाढली आहे. परिणामी सोन्यामध्ये गुंतवणूक एक सुरक्षित मानली जाते आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे आणि देशांतर्गत भागातही दर वाढत आहेत.
कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
हे वाचा-RBI ने बँक ऑफ इंडियाला ठोठावला 4 कोटींचा दंड, BOI चे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले
या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond, Gold prices today