Home /News /money /

Gold-Silver Rate Today:आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी दर वधारला, खरेदीआधी तपासा लेटेस्ट रेट

Gold-Silver Rate Today:आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी दर वधारला, खरेदीआधी तपासा लेटेस्ट रेट

आठवड्याच्या सुरुवातीलाच आज सोमवारी सोने दर (Gold Price Today) 48 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा भावही (Silver price Today) आज वधारला आहे.

  नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात (Gold-Silver Rate Today, 07 Feb 2022) तेजी पाहायला मिळाली. या तेजीनंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच आज सोमवारी सोने दर (Gold Price Today) 48 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा भावही (Silver price Today) आज वधारला आहे. चांदीच्या किंमती 1.11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहेत. काय आहे सोन्याचा दर - मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज एप्रिल डिलीव्हरी गोल्डचा दर 0.19 टक्के वाढीसह 48,014 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव - चांदीचा भाव आज वधारला आहे. एक किलो चांदीचा दर 1.11 टक्क्यांनी वधारला असून 61,521 रुपये इतका आहे. कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

  हे वाचा - LIC जगातील तिसरी सर्वात मोठी विमा कंपनी, मात्र रिटर्नच्या बाबतीत नंबर वन

  Goodreturns नुसार, आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold Price in Maharashtra) -
  शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
  मुंबई49250 रुपये49200 रुपये
  पुणे49100 रुपये49060 रुपये
  नाशिक49100 रुपये49060 रुपये
  नागपूर49250 रुपये49200 रुपये
  22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Price in Maharashtra) -
  शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
  मुंबई45200 रुपये45100 रुपये
  पुणे45100 रुपये45050 रुपये
  नाशिक45100 रुपये45050 रुपये
  नागपूर45200 रुपये45100 रुपये
  चांदीचा दर (Silver Price in Maharashtra) -
  शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
  मुंबई61600 रुपये61900 रुपये
  पुणे61600 रुपये61900 रुपये
  नाशिक61600 रुपये61900 रुपये
  नागपूर61600 रुपये61900 रुपये

  हे वाचा - सरकारी गॅरंटीसह भारताला 2023 मध्ये मिळेल 'डिजिटल रुपया'; वाचा सविस्तर माहिती

  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

  पुढील बातम्या