Home /News /money /

Gold Price Today: काल झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा महागलं सोनं-चांदी, पाहा लेटेस्ट रेट

Gold Price Today: काल झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा महागलं सोनं-चांदी, पाहा लेटेस्ट रेट

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव (Gold Price Today) 0.06 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. तर चांदीचा भाव (Silver Price Today) 0.17 टक्क्यांनी वाढला आहे.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : गुरुवारी सोने-चांदी दरात मोठी घसरण झाली होती. गुरुवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोने-चांदी दरात (Gold Silver Price Today) वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव (Gold Price Today) 0.06 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. तर चांदीचा भाव (Silver Price Today) 0.17 टक्क्यांनी वाढला आहे. गुरुवारी सोने दरात 1.12 टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. काय आहे सोन्याचा दर - मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 47,939 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 0.17 टक्क्यांच्या वाढीनंतर 62,049 रुपये प्रति किलो आहे. MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅमचा भाव जवळपास 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावरह पोहोचला होता. आज MCX वर सोनं 47,939 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने ट्रेड करत आहे. 2020 च्या तुलनेत आता सोनं सर्वोच्च स्तरावरुन 8261 रुपये स्वस्त मिळत आहे.

    हे वाचा - Petrol Diesel Prices Today: इथे तपासा मुंबई-पुण्यातील आजचा पेट्रोल-डिझेल भाव

    Goodreturns नुसार, आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold Price in Maharashtra) -
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई49250 रुपये49450 रुपये
    पुणे49530 रुपये49650 रुपये
    नाशिक49530 रुपये49650 रुपये
    नागपूर49250 रुपये49450 रुपये
    22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Price in Maharashtra) -
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई45150 रुपये45500 रुपये
    पुणे45400 रुपये45500 रुपये
    नाशिक45400 रुपये45500 रुपये
    नागपूर45150 रुपये45500 रुपये
    चांदीचा दर (Silver Price in Maharashtra) -
    शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
    मुंबई62000 रुपये63200 रुपये
    पुणे62000 रुपये63200 रुपये
    नाशिक62000 रुपये63200 रुपये
    नागपूर62000 रुपये63200 रुपये
    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - शेअर बाजारातील मोठ्या घसरणीत परदेशी ब्रोकरेज फर्म्सकडून 'या' शेअर्सला पसंती

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price

    पुढील बातम्या