• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: दिवाळीपूर्वी सोने-चांदी दरात तेजी, तपासा आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: दिवाळीपूर्वी सोने-चांदी दरात तेजी, तपासा आजचा लेटेस्ट रेट

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 46,503 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : दिवाळीपूर्वी सोने दरात वाढ होत आहे. भारतीय सराफा बाजारात आज 21 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) वधारला. तर चांदीच्या किंमतीतही (Silver Price Today) वाढ झाली आहे. मागील सत्रात दिल्लीत सराफा बाजारात सोने दर 46,496 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदी भाव 63,698 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दरात तेजी असून चांदीचा दर स्थिर आहे. सोन्याचा आजचा नवा दर - दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर आज 7 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारला आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 46,503 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही सोने दरात गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे. मागील वर्षीच्या हाय टाइम रेकॉर्डच्या तुलनेत सोनं अद्यापही स्वस्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या सोनं 9,697 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. तज्ज्ञांच्या मते दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात.

    EPFO: PF Account चे हे 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का? सहज मिळवता येईल लाभ

    चांदीचा नवा रेट - चांदी दरात आज वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीत 198 रुपयांची वाढ झाली असून भाव 63,896 रुपयांवर पोहोचला आहे.

    ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत 16 वेळा इंधन दरवाढ, आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल

    सोनं दरात वाढ का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Security) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमकुवत डॉलरमुळे सोने दरात तेजी आहे. आज कॉमेक्सवर सोने दरात वाढीची नोंद झाली. अमेरिकी बॉन्ड यील्डमध्ये घसरणीचा परिणामही सोने दरावर पाहायला मिळाला.
    Published by:Karishma
    First published: