नवी दिल्ली, 17 जानेवारी : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोने दरात (Gold Price) तेजी पाहायला मिळते आहे. सोने-चांदी दर वधारला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दरात 66 रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरात 99 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ झाली आहे.
MCX वर फेब्रुवारीसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 66 रुपयांच्या वाढीसह 47,844 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 98 रुपयांच्या वाढीसह 61701 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.
सराफा बाजारात शुक्रवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 4814 रुपये प्रति ग्रॅम होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 4698 रुपये प्रति ग्रॅम होता.
एका आठवड्यात सोनं 390 रुपयांनी महागलं -
मागील आठवड्यात सोने दरात 390 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली होती. तर चांदीच्या दरात 1508 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), मागील आठवड्यात सुरुवातीला सोन्याचा भाव 47,627 होता, जो शुक्रवारी वाढून 48,017 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 60,351 ने वाढून 61,859 रुपये प्रति किलोग्रॅम झाला.
IBJA कडून जारी करण्यात येणाऱ्या किमतीद्वारे वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड दराची माहिती मिळते. हा दर टॅक्स आणि मेकिंग चार्जच्या आधीचा असतो. IBJA कडून जारी केलेले दर देशभरात सर्वमान्य आहेत. परंतु याच्या किंमतीत GST सामिल नसतो.
घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर -
सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.