Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात तेजी, चांदीही महागली; तपासा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दरात तेजी, चांदीही महागली; तपासा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

आज 10 डिसेंबर रोजी सोने दरात वाढ (Gold Price Today) पाहायला मिळाली. आज चांदीचा भावही वधारला आहे.

    नवी दिल्ली, 10 डिसेंबर : आज 10 डिसेंबर रोजी सोने दरात वाढ (Gold Price Today) पाहायला मिळाली. आज चांदीचा भावही वधारला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज फेब्रुवारी डिलीवरी सोन्याच्या दरात 0.49 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर चांदीच्या किंमती (Silver price) 0.11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. देशात लग्नाचा सीजन सुरू असून सोन्याची मागणी वाढतेच आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसतो आहे. त्यामुळेच सोने-चांदी दरात वाढ पाहायला मिळत आहे. सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today) - आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने फेब्रुवारी वायदा भाव 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 48,008 रुपये प्रति ग्रॅमवर आहे. मागील वर्षी सोन्याचा भाव 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. या रेकॉर्ड स्तरावरुन सोनं सध्या 8000 रुपयांहून स्वस्त मिळत आहे. चांदीचा आजचा दर (Silver price) - चांदीचा दर आज 0.07 टक्क्यांच्या तेजीसह 60,839 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

    Credit Card च्या कर्जातून मुक्तता हवी? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

    SBI खातेधारकांना मिळणार 2 लाखांचा फायदा; काय करावं लागले?

    अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या