Home /News /money /

Gold price today: सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ, तपासा 22 कॅरेटचा मुंबईतील आजचा भाव

Gold price today: सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ, तपासा 22 कॅरेटचा मुंबईतील आजचा भाव

सोने-चांदी दरात (Gold price today) आज पुन्हा तेजी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव 0.08 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.

  नवी दिल्ली, 25 जानेवारी : सोने-चांदी दरात (Gold price today) आज पुन्हा तेजी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव 0.08 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. आज चांदीच्या दरातही (Silver price today) वाढ झाली आहे. काय आहे सोने-चांदी दर (Gold Silver Price) आज फेब्रुवारी डिलीव्हरी गोल्डची किंमत 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 48,605 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर आज चांदी 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 64,041 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार

  2020 मध्ये याच काळात MCX वर सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज सोनं MCX वर 48,605 रुपये प्रति 10 ग्रॅम लेवलवर आहे. Goodreturns नुसार आजचा दर - 24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold Price in Maharashtra) -
  शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
  मुंबई49660 रुपये49650 रुपये
  पुणे49320 रुपये49310 रुपये
  नाशिक49320 रुपये49310 रुपये
  नागपूर49660 रुपये49650 रुपये
  22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Price in Maharashtra) -
  शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
  मुंबई47660 रुपये47650 रुपये
  पुणे46780 रुपये46770 रुपये
  नाशिक46780 रुपये46770 रुपये
  नागपूर47660 रुपये47650 रुपये
  चांदीचा दर (Silver Price in Maharashtra) -
  शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
  मुंबई64100 रुपये64700 रुपये
  पुणे64100 रुपये64700 रुपये
  नाशिक64100 रुपये64700 रुपये
  नागपूर64100 रुपये64700 रुपये
  कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

  हे वाचा - Petrol-Diesel Prices Today: क्रूड ऑइलच्या वाढीदरम्यान IOCL कडून नवे दर जारी, पाहा आजचा पेट्रोल-डिझेल भाव

  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

  पुढील बातम्या