Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज वाढ, चांदीही महागली; एक तोळे दागिन्यांसाठी किती पैसे लागतील?

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज वाढ, चांदीही महागली; एक तोळे दागिन्यांसाठी किती पैसे लागतील?

सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांक किमतीपेक्षा 3,789 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

    मुंबई, 5 जुलै : सराफा बाजारात आजही सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Hike Today) उसळी पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या उच्चांकी दरापेक्षा सोनं आजही स्वस्त आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर (Gold Price) 52411 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 52218 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 193 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे. सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांक किमतीपेक्षा 3,789 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. चांदीचा दर चांदीचा दर आज (Silver Price) 58661 रुपये प्रति किलोवर उघडला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58123 प्रति किलोवर बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 538 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे. SBI ग्राहकांची कामं आता घरबसल्या होणार; 'हे' टोल फ्री फोन नंबरवर येतील कामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण होत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव 0.52 डॉलरने घसरून 1,809.10 डॉलर प्रति औंस झाला. दुसरीकडे, चांदी 0.09 डॉलरच्या वाढीसह 20.08 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे. मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता. Post Office Schemes: पाच वर्ष गुंतवणुकीचे उत्तम पर्याय, जास्त परतावा आणि सिक्युरिटीही सोन्याची शुद्धता कशी तपासणार? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver

    पुढील बातम्या