Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज तेजी; किती रुपयांना महाग झालं आज सोनं?

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज तेजी; किती रुपयांना महाग झालं आज सोनं?

सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर 58013 रुपये होता. शुक्रवारी चांदीचा दर 57,773 रुपयांवर बंद झाला. आज त्यात 240 रुपयांची वाढ दिसून आली.

  मुंबई, 4 जुलै : सोन्या-चांदीच्या दरात आज (4 जुलै) वाढ (Gold Silver Price Hike) झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा (Gold Rate Today) 10 ग्रॅमचा दर 548 रुपयांनी वाढून 52,339 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव (Silver Rate Today) 58,013 रुपयांवर उघडला. सराफा बाजारात, 22 कॅरेट सोन्याची किंमत, ज्यामध्ये बहुतेक दागिने बनवले जातात 47,900 रुपयांच्या आसपास आहेत. IBJA वेबसाइटवर येथे सोन्याचे दर शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 51,791 रुपयांवर बंद झाला. आज दर 548 रुपयांनी वाढले आहेत. 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 52,129 रुपये होती. 22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 47,943 रुपये होती. त्याच वेळी, 18 कॅरेटची किंमत 39,254 रुपयांवर पोहोचली. 14 कॅरेट सोन्याचा दर 30,618 रुपये होता. चांदीचा दर सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर 58013 रुपये होता. शुक्रवारी चांदीचा दर 57,773 रुपयांवर बंद झाला. आज त्यात 240 रुपयांची वाढ दिसून आली. SBI ग्राहकांची कामं आता घरबसल्या होणार; 'हे' टोल फ्री फोन नंबरवर येतील कामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा वेगाने व्यवहार होत आहे. अमेरिकेत सोने 2.66 डॉलरच्या वाढीसह 1,810.96 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी 0.01 डॉलरच्या घसरणीसह 19.84 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.
  मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता. Post Office Schemes: पाच वर्ष गुंतवणुकीचे उत्तम पर्याय, जास्त परतावा आणि सिक्युरिटीही सोन्याची शुद्धता कशी तपासणार? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

  पुढील बातम्या