मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महाग; सोनं आजही उच्चांकी किमतीपेक्षा 3900 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महाग; सोनं आजही उच्चांकी किमतीपेक्षा 3900 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 3,903 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

    मुंबई, 10 ऑगस्ट : सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आज मोठा धक्का बसला आहे. बुधवारी सकाळी जाहीर झालेल्या किमतीनुसार आज सोने आणि चांदी महाग झाली आहे. दहा ग्रॅम सोने आज 52,297 रुपयांना विकले जात आहे, तर एक किलो चांदीचा भाव 58,291 रुपयांवर पोहोचला आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 52297 रुपये आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 52184 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 113 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे. यानंतरही, सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 3,903 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता घरबसल्या अ‍ॅपद्वारे तपासा, तुमच्या मोबाईलमध्ये आहे का 'हे' अ‍ॅप? चांदीही महागली आज चांदीचा दर 58291 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58106 प्रति किलोवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचा दर 185 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे. सोनं, डायमंड प्लॅटिनमचा साज असेलेली देशातील महागडी राखी वाढवणार भावाच्या मनगटाची शोभा कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या