Home /News /money /

Gold Price Today: लग्नसराईत सोनं महागलं, चांदीची किंमतही वाढली; चेक करा नवे दर

Gold Price Today: लग्नसराईत सोनं महागलं, चांदीची किंमतही वाढली; चेक करा नवे दर

Gold Price Today: सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. सकाळच्या व्यवहारात सोने 49,930 रुपयांवर उघडले आणि व्यवहाराला सुरुवात झाली. थोड्याच वेळात, फ्युचर्सची किंमत 0.17 टक्क्यांनी वाढून 49,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 मे : जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोमवारी भारतीय सराफा बाजारातही उसळी दिसून आली. आज सकाळच्या व्यवहारात सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवरुन वर आला आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. भावात वाढ झाली असली तरी सोन्याचा वायदा भाव 50 हजारांच्या खाली तर चांदीचा भाव 60 हजारांच्या खाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 87 रुपयांनी वाढून 49,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. यापूर्वी सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. सकाळच्या व्यवहारात सोने 49,930 रुपयांवर उघडले आणि व्यवहाराला सुरुवात झाली. थोड्याच वेळात, फ्युचर्सची किंमत 0.17 टक्क्यांनी वाढून 49,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. SBI च्या ग्राहकांना महिनाभरात दुसरा झटका; कर्जाचा EMI आणखी वाढणार, काय आहे कारण? चांदीची चमकही वाढली सोन्याच्या सोबत आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे, आज सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 269 रुपयांनी वाढून 59,531 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी हा व्यापार 59,437 रुपयांपासून खुलेआम सुरू होता. मागणीत सतत होणाऱ्या वाढीमुळे अल्पावधीतच त्याची किंमत 0.45 टक्क्यांनी वाढून 59,531 वर पोहोचली. गेल्या काही व्यापारी सत्रांमध्ये चांदीच्या दरातही सातत्याने घसरण होत आहे. शेतकऱ्यांना वाट पाहण्याची गरज नाही, ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता जागतिक बाजारपेठेत दर काय आहे? जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात नरमाई दिसून येत आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.21 टक्क्यांनी घसरून 1,808.84 डॉलर प्रति औंस झाली, तर चांदीची स्पॉट किंमत 21.6 डॉलर प्रति औंस झाली. या कालावधीत चांदीच्या किमतीत 0.79 टक्क्यांनी घसरण झाली आहे. येत्या काळात जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर बाजारावरही दबाव वाढला आहे. अमेरिका, युरोपसह जगभरातील शेअर बाजार अजूनही दबावाखाली असून गुंतवणूकदारांनाही आपले पैसे बुडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत हे सुरक्षित ठिकाण म्हणून सोन्याकडे वळत आहेत आणि सोन्याची खरेदी वाढवत आहेत. भारतीय सराफा बाजारात लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी आहे. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात सोने-चांदी महाग होत आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today, Gold prices today, Money

    पुढील बातम्या