Gold Price Today: सोने दरात वाढ, तरीही गुंतवणुकीसाठी चांगली संधी, वाचा 10 ग्रॅमसाठीचा आजचा दर

भारतीय सराफा बाजारात आज 21 जून 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) वाढ झाली आहे.

भारतीय सराफा बाजारात आज 21 जून 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) वाढ झाली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 जून : आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय सराफा बाजारात आज 21 जून 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही आज वाढ झाली आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,027 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदीचा भाव 66,584 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदी दरात काहीशी तेजी होती. सोन्याचा आजचा भाव (Gold Price, 21 June 2021) - दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 250 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 46,277 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 रोजी गोल्ड रेट 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका सर्वोच्च दरावर होता. त्यानुसार, आता सोनं सर्वोच्च दरावरुन 10,731 रुपयांनी खाली आलं आहे. त्यामुळे आता सध्या गुंतवणूकीसाठी चांगली संधी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. चांदीचा नवा भाव (Silver Price, 21 June 2021) - चांदीच्या दरातही आज काहीशी वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात आज सोमवारी चांदीच्या दरात 258 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह चांदीचा भाव आज 66,842 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.

  (वाचा - Online Financial Fraud झालाय? घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल)

  सोने दरात तेजी का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात आलेल्या घसरणीनंतर आता आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात काहीशी वाढ झाली. डॉलरच्या मजबूतीनंतर, अमेरिकी बॉन्ड यील्डमध्ये झालेल्या घसरणीमुळे सोने दरात काहीशी तेजी आहे. मोतीलाल ओसवाल फायनेंशियल सर्विसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितलं, की मागील आठवड्यात सोन्यात 6 टक्क्यांची घसरण आली आहे. ही मागील 15 महिन्यातील एका आठवड्यातील सर्वात मोठी घसरण होती.
  Published by:Karishma Bhurke
  First published: