नवी दिल्ली, 18 जानेवारी : आज मंगळवारी सोने दरात (Gold Price Today) कोणताही बदल झालेला नाही. सोमवारी संध्याकाळी ज्या दरात सोने भाव बंद झाला होता. त्याच दराने मंगळवारी गोल्ड रेट सुरू झाला. सोमवारी संध्याकाळी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा रेट 48,142 रुपयांवर बंद झाला होता. मंगळवारी सोने दर पुन्हा 48,142 दरानेच खुला झाला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दर 0.05 टक्क्यांनी घसरुन 47,892 रुपये 10 ग्रॅम इतका आहे. चांदीच्या दरात मात्र (Silver Price Today) घसरण झाली आहे. चांदीचा भाव 91 रुपयांनी घसरला असून 61,668 किलोग्रॅम इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोने दर स्थिर आहे.
काय आहे आजचा सोन्याचा भाव -
24 कॅरेट सोन्याचा भाव 48,142 रुपये आहे. 23 कॅरेट सोन्याचा दर 47,949 रुपये आहे. 22 कॅरेटचा वायदे भाव 44,048 रुपये आहे. 18 कॅरेटचा भाव 36,107 रुपयांवर पोहोचला आहे.
चांदीचा रेट -
सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचा रेट 61,668 रुपये आहे. सोमवारी चांदीचा भाव 61,759 रुपये इतका होता. चांदीच्या दरात 91 रुपयांची घसरण झाली आहे.
दरम्यान, देशामध्ये कोरोना संक्रमणाची (Coronavirus Latest Update in India) स्थिती अजूनही कमी झालेली नाही आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Coronavirus Pandemic) लोकं त्रस्त आहेत. हा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी या काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात (एप्रिल ते डिसेंबर 2021) दुपटीपेक्षा अधिक होऊम 38 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.
देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.
कशी तपासाल सोन्याची शुद्धता -
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर -
सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.