नवी दिल्ली, 17 मार्च: सोन्याचांदीच्या (
Gold and Silver) किंमतीमध्ये आज किरकोळ वाढ झाल्याचे पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते, त्यानंतर सोन्याच्या दरात 11500 हजार रुपयांची घसरण झाली आहे. अर्थात गेल्यावर्षी पेक्षा सोन्याचे दर खूप कमी झाले आहेत. आज मल्टि कमोडिटी एक्सचेंज (
MCX) वर सोन्याचे दराचे ट्रेडिंग (
Gold Rates) तेजीत सुरू झाले. 77 रुपयांच्या वाढीमुळे सोन्याचे दर 44890 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याशिवाय चांदी (
Silver Price Today)चे दर 76 रुपयांनी वाढले असून आज चांदीचे दर 66995 रुपये प्रति किलो झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय मार्केटबाबत बोलायचे झाले तर सोन्याच्या दरात याठिकाणीही तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेमध्ये सोन्याच्या दरात 4.16 डॉलरची तेजी पाहायला मिळाली, यानंतर दर 1,735.93 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीचे दर 0.01 डॉलरच्या घसरणीमुळे 26.19 डॉलरच्या स्तरावर आहेत.
महानगरांमध्ये काय आहेत सोन्याचे भाव?
दिल्ली- 48150 रुपये प्रति तोळा (24 कॅरेट)
चेन्नई- 46100 रुपये प्रति तोळा (24 कॅरेट)
मुंबई- 44,840 रुपये प्रति तोळा (24 कॅरेट)
कोलकाता- 46,900 रुपये प्रति तोळा (24 कॅरेट)
(हे वाचा-Insurance Alert! 1 एप्रिलपासून तुमच्या आरोग्य विम्याच्या किमतीत होणार मोठा बदल)
मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात होते हे दर
दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात (
Gold Rates on 16th March 2021) 45 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 44,481 रुपये प्रति तोळा झाले होते. तर चांदीच्या दरात किरकोळ 116 रुपयांची वाढ झाली होती. यानंतर चांदीचे भाव 66,740 रुपये प्रति किलो झाले होते.
(हे वाचा-क्रेडिट कार्डाच्या अतिवापराने होते कोकेनसारखीच नशा, सर्व्हेतून धक्कादायक खुलासा)
का वाढतायंत मौल्यवान धातूंचे दर?
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते, न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर सोन्याचे दर किरकोळ कमी होऊन स्थिर राहिले आहेत. त्यानंतर भारतात सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. त्यांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे देखील सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.