मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold-Silver Rate: शुक्रवारी वधारले सोन्याचांदीचे दर, वाचा काय आहेत लेटेस्ट किंमती

Gold-Silver Rate: शुक्रवारी वधारले सोन्याचांदीचे दर, वाचा काय आहेत लेटेस्ट किंमती

Gold-Silver Rate: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी झाल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यात रिकव्हरी पाहायला मिळाली

Gold-Silver Rate: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी झाल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यात रिकव्हरी पाहायला मिळाली

Gold-Silver Rate: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी झाल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यात रिकव्हरी पाहायला मिळाली

नवी दिल्ली, 15 जानेवारी: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी झाल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यात रिकव्हरी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात 15 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) आणि चांदीचे दरही (Silver Price Today) महागले आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. सोन्याचे दर प्रति तोळा 286 रुपयांनी वधारले आहेत तर आज शुक्रवारी चांदीच्या दरात आज 558 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.

शुक्रवारी काय आहेत सोन्याचे भाव? (Gold Price on 15th January 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोनं प्रति तोळा 286 रुपयांनी महाग झालं आहे. या वाढीनंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 48,690 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 48,404 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,852 डॉलर प्रति औंस आहेत.

शुक्रवारी काय आहेत चांदीचे भाव? (Silver Price on 15th January 2021)

सोन्यापाठोपाठ आज चांदीला देखील झळाळी मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरांत वाढ झाली आहे.  चांदीचे दर 558 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 65,147 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात चांदीचे भाव 64,599 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market) चांदीचे भाव  25.40  डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांच्या मते आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 3 पैशांनी घसरून 73.07 च्या स्तरावर आले आहे. जो बायडन यांनी 1.9 ट्रिलियन डॉलरच्या केलेल्या नवीन पॅकेजच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमतीत रिकव्हरी पाहायला मिळते आहे. 

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today