Home /News /money /

Gold Price : आठवड्याभरात सोनं महागलं, सोन्यापाठोपाठ चांदीचाही भाव वधारला

Gold Price : आठवड्याभरात सोनं महागलं, सोन्यापाठोपाठ चांदीचाही भाव वधारला

लग्न सराईत आता जवळ येत आहेत. त्यामुळे सराफ बाजारातही तेजी दिसत आहे. विशेष म्हणजे सोने-चांदीच्या दरात गेल्या आठवड्याभरात वाढ झाल्याचं चित्र आहे.

    नवी दिल्ली, 16 जानेवारी : भारतात सोने-चांदीच्या आभूषणांची एक वेगळी परंपरा आहे. लग्न सराईत किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सोन्याचे दागिने परिधान केले जातात. त्यामुळे देशात सोन्याची मागणी जात आहे. सोन्याची फक्त देशातच नाही जगभरात मागणी आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतात. विशेष म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये अनेक तरुण-तरुणींच्या लग्नाचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमांआधी सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. संसाधनांची मागणी वाढली की त्याची किंमत वाढते, असं बोलतात. तसंच काहीसं सोने-चांदीच्या बाबतीत घडताना दिसत आहे. सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्याभरात चांगलीच वाढ झाल्याचं चित्र आहे. लग्न सराईत आता जवळ येत आहेत. त्यामुळे सराफ बाजारातही तेजी दिसत आहे. विशेष म्हणजे सोने-चांदीच्या दरात गेल्या आठवड्याभरात वाढ झाल्याचं चित्र आहे. या आठवड्याभरात सोन्यासह चांदीचाही भाव वधारला आहे. या आठवड्यात सोन्याचा दर हा प्रती 10 ग्रॅम (1 तोळे) सोन्यामागे 390 रुपयांची वाढ झाल्याची नोंद आहे. तर चांदीच्या भावात प्रतिकिलो 1508 रुपयांची वाढ झाल्याचं चित्र आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच आयबीजेएच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 10 ते जानेवारी दरम्यानच्या या आठवड्यात सोन्याचा भाव सुरुवातीला प्रति तोळा (10 ग्रॅम) 47,627 रुपये इतका होता. पण हाच भाव शुक्रवारी वाढत जाऊन 48,017 रुपयांपर्यंत पोहोचला. तर चांदीची किंमत प्रतिकिलो 60,351 रुपयांवरुन 61,859 रुपयांवर पोहोचला. आईबीजीएकडून नेहमी सोने-चांदीच्या योग्य भावाची माहिती मिळते. हे सर्व दर टॅक्स आणि मेकिंग चार्जेस लावण्याअगदरचे आहेत. विशेष म्हणजे आईबीजीएकडून जारी करण्यात आलेल्या किंमती या देशभरात मान्य असतात. पण त्याच्या किंमतीत जीएसटी नसतं. (गर्लफ्रेंडच्या 'त्या' व्हिडीओने बॉयफ्रेंडला झटका, सोशल मीडियावरही चर्चा) सोन्याचा भावात कसा बदला झाला त्याची आकडेवारी : 10 जानेवारी 2022- 47,627 रुपये प्रति 10 ग्रॅम 11 जानेवारी 2022- 47,705 रुपये प्रति 10 ग्रॅम 12 जानेवारी 2022- 47,943 रुपये प्रति 10 ग्रॅम 13 जानेवारी 2022- 48,031 रुपये प्रति 10 ग्रॅम 14 जानेवारी 2022- 48,017 रुपये प्रति 10 ग्रॅम चांदीच्या भावात कसा बदला झाला त्याची आकडेवारी : 10 जानेवारी 2022- 60,351 रुपये प्रति किलो 11 जानेवारी 2022- 60,440 रुपये प्रति किलो 12 जानेवारी 2022- 60,831 रुपये प्रति किलो 13 जानेवारी 2022- 61,753 रुपये प्रति किलो 14 जानेवारी 2022- 61,859 रुपये प्रति किलो घरी बसून मिस कॉल करुन सोन्याचा दर जाणून घ्या सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसूनही जाणून घेऊ शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगू इच्छितो. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस कॉल करा. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता. (महिला ऑनलाईन लघवी विकून कमवते बक्कळ पैसा, एक कप युरीनची किंमत तब्बल...) सोन्याची शुद्धता पारखण्यासाठी काय करावं? तुम्ही घरात बसून सोन्याची शुद्धता पारखू शकता. त्यासाठी सरकारक़डून एक अॅप जारी करण्यात आला आहे. तुम्ही ‘BIS Care app’ च्या माध्यमातून सोन्याची शुद्धता पारखू शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही फक्त सोन्याची शुद्धता पारखू शकत नाही तर त्यापलीकडे जावून अनेक माहिती मिळवू शकता. तसेच सोन्याशी संबंधित काही तक्रार असेल तर तुम्ही या अॅपच्या माध्यमातूनही तक्रार करु शकता.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या