• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोने दरात दिवसभर तेजी, तर चांदीचा भावही वधारला; पाहा 10 ग्रॅम सोन्याचा नवा रेट

Gold Price Today: सोने दरात दिवसभर तेजी, तर चांदीचा भावही वधारला; पाहा 10 ग्रॅम सोन्याचा नवा रेट

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात (Gold Price Today) आलेल्या तेजीमुळे भारतीय बाजारात आज 3 मे 2021 रोजी मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढीची नोंद झाली. चांदीचा दरही आज (Silver Price Today) वधारला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 मे : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात (Gold Price Today) आलेल्या तेजीमुळे भारतीय बाजारात आज 3 मे 2021 रोजी मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढीची नोंद झाली. चांदीचा दरही आज (Silver Price Today) वधारला. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,270 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीचा भाव 66,849 रुपये प्रति किलोग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात तेजी होती, तर चांदीचा भाव काहीसा वधारला. सोन्याचे नवे दर (Gold Price, 3 May 2021) - दिल्ली सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचा भाव 310 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला. तर राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव 46,580 रुपये 10 ग्रॅम आहे. या आधीच्या सत्रात सोन्याचा भाव 46,270 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

  (वाचा - तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर धोक्याची घंटा! IT डिपार्टमेंट करेल जप्त)

  चांदीचा आजचा नवा दर (Silver Price, 3 May 2021) - चांदीचा भावही आज वधारला. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 580 रुपयांनी वधारला असून 67,429 रुपयांवर पोहचला आहे. याआधी चांदीचा दर 66,849 रुपये प्रति किलोग्रॅम होता. (वाचा - सोन्याचे दर 60000 पार जाण्याची शक्यता, या 5 गोष्टी ठरणार कारणीभूत) सोने-चांदी दरात वाढ होण्यामागे काय आहे कारण? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कच्या कमॉडिटी एक्सचेंजवर सोमवारी सोने दरात वाढ झाली. याचाच परिणाम भारतीय बाजारावर झाला. त्याशिवाय डॉलरही इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत कमजोर झाल्यानेही आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात तेजी राहिली. तसंच कोरोना काळात जगभरात अनिश्चिततेचं वातावरण आहे. अशा परिस्थितीचा सोन्याच्या  दरावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: