• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदी दरात वाढ, पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदी दरात वाढ, पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

  • Share this:
    नवी दिल्ली, 26 जुलै: सोने-चांदी (Gold-Silver) दरात आज वाढ नोंदवण्यात आली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने दर (Gold price today) 0.19 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने दर 90 रुपयांच्या तेजीसह 47624 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर चांदी (Silver price today) 0.29 टक्के म्हणजेच 195 रुपयांच्या वाढीसह 67219 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. मागील वर्षी 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा दर जवळपास 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होता. तर आज MCX नुसार, सोनं 47624 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. मागील वर्षीच्या उच्चांकी पातळीवरुन सोने दर अद्याप 8576 रुपये स्वस्त आहे. दरम्यान, 2020 दरम्यान सोन्याने गुंतवणुकदारांना 28 टक्के रिटर्न दिले आहेत. 2019 मध्येही गोल्ड रिटर्न जवळपास 25 टक्के होता. जर तुम्हाला लाँग टर्मसाठी गुंतवणूक करायची असेल, तर आता सोनं गुंतवणुकीसाठी चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. आगामी काळात सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता सोने-चांदीत गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. 1 ऑगस्टपासून पगार, pension आणि EMI पेमेंटसाठी लागू होणार नवा नियम, RBI ची माहिती सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

    Fraud Alert! या 4 चुका अजिबात करू नका, Online Banking बाबत महत्त्वपूर्ण माहिती

    अशी तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
    Published by:Karishma
    First published: