Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, काय आहे आजचा भाव

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, काय आहे आजचा भाव

दिल्ली सराफा बाजारात आज 26 एप्रिल 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 47000 रुपयांहून कमी झाला. चांदीचा भावही (Silver Price Today) आज कमी झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतीय बाजारात सोने दरात घसरण पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात आज 26 एप्रिल 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 47000 रुपयांहून कमी झाला. चांदीचा भावही (Silver Price Today) आज कमी झाला. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 47,057 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदी 68,971 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर वधारला, तर चांदीचा भाव स्थिर होता.

सोन्याचा आजचा नवा दर (Gold Price, 26 April 2021) -

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा दर 81 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला. राजधानी दिल्लीत 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा आज नवा दर 46,976 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. या आधीच्या सत्रात सोने दर 47,057 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

चांदीचा नवा दर (Silver Price, 26 April 2021) -

चांदीचा भावही आज कमी झाला. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 984 रुपयांनी घसरुन 67,987 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला. या आधीच्या सत्रात चांदीचा दर 68,971 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

(वाचा - मुंबईत अवघ्या 80 रुपयात झाली ब्रॅन्डची सुरुवात; आता Turnover पोहोचला 800 कोटींवर)

सोने दरात घसरण का?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमकुवत डॉलर आणि कोरोना महामारीच्या वाढत्या चिंतेमुळे न्यूयॉर्क येथील कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचे दर वाढले. तर रुपया डॉलरच्या तुलनेत वधारल्याने भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली.

कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याने, गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा एकदा सोन्याकडे वळू शकतात, याच्या सोन्याच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: April 26, 2021, 7:15 PM IST

ताज्या बातम्या