Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात काहीशी घसरण, चांदीचा भावही उतरला; तपासा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने दरात काहीशी घसरण, चांदीचा भावही उतरला; तपासा लेटेस्ट रेट

भारतीय सराफा बाजारात मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी सोनं-चांदी (Gold-Silver Rates Today) स्वस्त झालं आहे.

    नवी दिल्ली, 31 जानेवारी : भारतीय सराफा बाजारात मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी सोनं-चांदी (Gold-Silver Rates Today) स्वस्त झालं आहे. सोने दरात (Gold Price Today) काहीशी घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 47,507 रुपये इतकी आहे. तर एक किलो चांदीचा भाव (Silver Price Today) 60,914 रुपये आहे. सोन्याचा आजचा भाव - दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा दर 5 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा दर 47,507 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 47,512 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा आजचा भाव - दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 27 रुपयांनी घसरला आहे. या घसरणीनंतर चांदीचा भाव 60,914 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा रेट 60,941 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅमचा भाव जवळपास 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावरह पोहोचला होता. आज MCX वर सोनं 47,636 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने ट्रेड करत आहे. 2020 च्या तुलनेत आता सोनं सर्वोच्च स्तरावरुन 8693 रुपये स्वस्त मिळत आहे.

    हे वाचा - Health Insurance पॉलिसी बदलण्याचा विचार करताय? सोप्या पद्धतीने पॉलिसी पोर्ट करा

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

    हे वाचा - Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? काय आहे कारण

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या