Home /News /money /

Gold Price Today: आज सोने दरात मोठी घसरण, स्वस्तात खरेदीची संधी; पाहा 10 ग्रॅमचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: आज सोने दरात मोठी घसरण, स्वस्तात खरेदीची संधी; पाहा 10 ग्रॅमचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत वाढ होत असताना आज घसरणीची नोंद झाली आहे.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी : मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत वाढ होत असताना आज घसरणीची नोंद (Gold Price Today) झाली आहे. जर तुम्हीही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी ठरू शकते. गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने दरात 1.12 टक्क्यांची मोठी घसरण झाली. तसंच चांदीचा भावही (Silver Price Today) कमी झाला आहे. MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर सोने दर 48,305 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. म्हणजेच गोल्ड आपल्या सर्वोच्च स्तरावरुन 7900 रुपये स्वस्त मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव 1.12 टक्क्यांच्या घसरणीसह 48,305 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदीचा भाव 1.23 टक्क्यांच्या घसरणीसह 63,282 रुपये प्रति किलो इतका आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. कोरोनाचा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी या काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या