• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: आज पुन्हा सोने-चांदी दरात घसरण, इथे तपासा आजचा 10 ग्रॅमचा भाव

Gold Price Today: आज पुन्हा सोने-चांदी दरात घसरण, इथे तपासा आजचा 10 ग्रॅमचा भाव

सोने-चांदी दरात सध्या घसरण सुरू आहे. अशात तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : सोने-चांदी दरात सध्या घसरण सुरू आहे. अशात तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर आज ऑक्टोबर डिलीवरी सोन्याचा भाव 0.20 टक्क्यांनी घसरला आहे. तर चांदीच्या दरात 0.51 टक्क्यांची घसरण झाली आहे. काय आहे आजचा सोने-चांदी भाव (Gold Silver Price) - ऑक्टोबर डिलीवरी सोन्याचा भाव आज 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 47,819 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदी 0.51 घसरणीसह, 1 किलो चांदीचा आजचा भाव 62,564 रुपये आहे. रेकॉर्ड स्तरावरुन 8,381 रुपये स्वस्त झालं सोनं - मागील वर्षी 2020 मध्ये याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर सोन्याचा ऑगस्ट वायदे भाव 47,819 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत सोनं जवळपास 8,381 रुपये स्वस्त झालं आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

    सणासुदीच्या काळात तेल होणार स्वस्त; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर - सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

    Petrol-Diesel Price today: सर्वसामान्यांना फटका, आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा किती वाढले दर

    अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
    Published by:Karishma
    First published: