मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, तपासा आजचा 10 ग्रॅमसाठीचा गोल्ड रेट

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, तपासा आजचा 10 ग्रॅमसाठीचा गोल्ड रेट

आज सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले.

आज सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले.

आज मंगळवारी सोने-चांदी दरात (Gold-Silver Price Today) घसरणीची नोंद करण्यात आली.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : आज मंगळवारी सोने-चांदी दरात (Gold-Silver Price Today) घसरणीची नोंद करण्यात आली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं (Gold price) 0.05 टक्के स्वस्त झालं आहे. या घसरणीसह आज सोनं 48,277.00 रुपयांसह ट्रेड करत आहे. तर दुसरीकडे चांदीचा दरही कमी झाला आहे. आज चांदीच्या दरात (Silver price today) 0.25 टक्क्यांची घसरण झाली आहे. चांदी 61,428.00 ट्रेड करत आहे.

सध्या लग्नसराईचा सीजन सुरू असून अनेक जण मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. अशात जे लोक सोनं खरेदीचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. सध्या सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन स्वस्तात मिळत आहे.

आज सोनं जवळपास 33 रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या किंमती आज 151 रुपयांची घसरण झाली आहे. कोरोनाच्या नव्या वेरिएंड ओमिक्रोनमुळे सोने दरात मागील काही दिवसांपासून सतत घसरण पाहायला मिळत आहे.

सरकारी मदतीने कमी गुंतवणुकीतून सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल भरभक्कम कमाई

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

Gold ETF मध्ये गुंतवणूकदारांचा कल; नोव्हेंबरमधील गुंतवणूक 683 कोटींवर

अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today