Home /News /money /

Gold price today: महिन्याभराच्या निच्चांकी स्तरावर सोने दर, चांदीही स्वस्त; पाहा काय आहे आजचा भाव

Gold price today: महिन्याभराच्या निच्चांकी स्तरावर सोने दर, चांदीही स्वस्त; पाहा काय आहे आजचा भाव

MCX वर सोन्याचा भाव (Gold price today) आज 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 46,872 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे.

  नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : कमकुवत जागतिक संकेतांचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर पाहायला मिळाला आहे. MCX वर सोन्याचा भाव (Gold price today) आज 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 46,872 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. यावेळी हा भाव मागील एक महिन्याच्या निच्चांकी स्तरावर ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात (silver price today) आज घसरण झाली आहे. चांदी 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह 63,345 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मागील सत्रात सोने दरात 0.4 टक्क्यांची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात 0.9 टक्के घसरण झाली होती. 24 कॅरेट गोल्ड रेट - सोन्याचे दर सर्व शहरात वेगवेगळे असतात. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याशिवाय चेन्नईत 48390 रुपये, मुंबईत 47070 रुपये आणि कोलकातामध्ये 49140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

  नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी, PF Account चं हे काम करा लगेच, अन्यथा येईल समस्या

  Missed Call द्वारे जाणून घ्या लेटेस्ट गोल्ड रेट - सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

  Petrol Price Today: आजचे दर जारी, जाणून घ्या मुंबईतील लेटेस्ट पेट्रोल-डिझेल भाव

  अशी तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

  पुढील बातम्या