• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला; जाणून घ्या आजचा गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला; जाणून घ्या आजचा गोल्ड रेट

आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदी दरात घसरण पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीवर दबाब आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदी दरात घसरण पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीवर दबाब आहे. जागतिक कमकुवत संकेत हे यामागचं प्रमुख कारण आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर सोने दरात (Gold Price Today) 0.13 टक्क्यांची घसरण झाली असून दर 45,928 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) 1 टक्का घसरण झाली असून दर 59,427 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मागील सत्रात सोने दरात 0.16 टक्के आणि चांदीमध्ये 1.76 टक्के घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मजबूतीमुळे गोल्ड रेट कमी असल्याचं बोललं जात आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगानिस्तानातील परिस्थितीचा परिणामही सोने दरावर होवून सोने दरात वाढ होऊ शकते. वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

  व्यवसाय सुरू करायचा विचार आहे? या Profitable Business मध्ये होईल मोठा फायदा

  सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

  Home Loan साठी अप्लाय करताना अजिबात विसरू नका हे 6 मुद्दे, सहजपणे मिळेल कर्ज

  सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
  Published by:Karishma
  First published: