मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोने दरात काहीशी घसरण, चांदीही 1400 रुपयांहून उतरली, पाहा आजचा गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दरात काहीशी घसरण, चांदीही 1400 रुपयांहून उतरली, पाहा आजचा गोल्ड रेट

अनेक दिवसांच्या तेजीनंतर आज 19 मे 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) काहीशी घसरण झाली आहे. तर चांदीचा दरही (Silver Price Today) घसरला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 19 मे : भारतीय सराफा बाजारात अनेक दिवसांच्या तेजीनंतर आज 19 मे 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) काहीशी घसरण झाली आहे. तर चांदीचा दरही (Silver Price Today) घसरला आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 47,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा दर 73,232 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज गोल्ड रेट घसरला असून, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

सोन्याच्या नव्या किंमती (Gold Price, 19 May 2021) -

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोने दरात 97 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली, राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव घसरुन 47,853 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचा दर 47,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

चांदीचा नवा दर (Silver Price, 19 May 2021) -

चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा भाव 1,417 रुपयांनी घसरुन 71,915 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. याआधीच्या सत्रात चांदीचा दर 73,232 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

सोने-चांदी दरात घसरण का?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सोन्याच्या किंमतीत, आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारांमुळे बदल होत आहेत.

(वाचा - सरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा)

अशी तपासा सोन्याची शुद्धता -

सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' वरुन ग्राहक (Consumer) सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे (App) केवळ सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करता येऊ शकते. या अ‍ॅपमध्ये वस्तूचं लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास, ग्राहक याची तक्रार त्वरित या अ‍ॅपद्वारे करू शकतात. तसंच तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहकाला तक्रार दाखल केल्याची माहितीही मिळेल.

First published: