मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात घसरण, खरेदीआधी तपासा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात घसरण, खरेदीआधी तपासा लेटेस्ट रेट

आज सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सोन्याचा प्रति तोळा भाव 47000 रुपयांहून कमी झाला आहे.

आज सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सोन्याचा प्रति तोळा भाव 47000 रुपयांहून कमी झाला आहे.

आज सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सोन्याचा प्रति तोळा भाव 47000 रुपयांहून कमी झाला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : सणासुदीच्या काळात सोन्याची मोठी मागणी असते. याच दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सोन्याचा प्रति तोळा भाव 47000 रुपयांहून कमी झाला आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज घसरण झाली असून भाव 64000 रुपये प्रति किलोग्रॅमहून कमी झाला आहे. भारतीय सराफा बाजारात आज 27 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याचा भाव आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन 9 हजार रुपयांहून अधिक स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दर कमी झाला. तर चांदीचा भावही उतरला.

मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 46,991 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 64,143 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.

काय आहे आजचा सोन्याचा दर -

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोने दरात 244 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीची नोंद झाली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 47 हजार रुपयांवरुन 46,747 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. फेस्टिव्ह सीजनमध्ये सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन 9453 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोने दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता.

दिवाळीत 'या' खास वेळेत शेअर बाजारातून पैसे कमावण्याची संधी, वाचा सविस्तर

चांदीचा नवा दर -

चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात आज बुधवारी चांदीचा दर 654 रुपयांच्या घसरणीसह 63,489 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, वाचा 8 दिवसांत किती मिळेल नफा?

सोने दरात घसरण का?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Security) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज कॉमेक्सवर सोने दरात 0.32 टक्क्यांची घसरण झाली, तर आंतरराष्ट्रीय बाजारात मिळालेल्या घसरणीच्या संकेतांमुळेही गोल्ड दरात घसरण झाली आहे.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today