• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा 10 ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा 10 ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट

राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 47,153 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. सणासुदीच्या कालात धनोत्रयोदशीच्या आधी सराफा बाजारात सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन 9,047 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : भारतीय सराफा बाजारात आज 26 ऑक्टोबर 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) काहीशी घसरण झाली आहे. सोने दर मागील वर्षीच्या तुलनेत 9 हजारांनी स्वस्त आहे. चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज घसरण झाली आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 47,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 64,740 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव स्थिर आहे. सोन्याचा आजचा भाव - दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोने दरात 5 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. त्यामुळे राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 47,153 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. सणासुदीच्या कालात धनोत्रयोदशीच्या आधी सराफा बाजारात सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन 9,047 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये गोल्ड रेट 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर होता.

    म्हणे, 'जितका जास्त खर्च तितकी जास्त पैशांची बचत', महिलेचा विचित्र सेव्हिंग फंडा

    चांदीचा आजचा दर - चांदीच्या दरात आज घसरणीची नोंद झाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 287 रुपयांच्या कमीसह 64,453 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला.

    Price Hike : दिवाळीनंतर एसी, टीव्ही, फ्रीजही महागणार

    सोने दरात कमी का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Security) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज कॉमेक्सवर गोल्ड दरात 0.27 टक्के घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या वाढीच्या संकेतांमुळेही सोने दरात काहीशी कमी आली आहे. तसंच अमेरिकी बॉन्ड यील्डमध्ये वाढ आणि डॉलरच्या मजबूतीमुळे सोने दरात कमी आली आहे.
    Published by:Karishma
    First published: