Home /News /money /

Gold Rate Today: चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या दरातही घट, उच्चांकी किमतीपेक्षा सोनं 4714 रुपयांनी स्वस्त

Gold Rate Today: चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या दरातही घट, उच्चांकी किमतीपेक्षा सोनं 4714 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: आजही सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,714 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

    मुंबई, 3 ऑगस्ट : सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे पुन्हा एकदा बाजारात सोन्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. मंगळवारी बाजार बंद होईपर्यंत सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली होती. मात्र आज बाजार उघडताच पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 51 हजार 486 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 51 हजार 549 रुपये प्रति तोळ्यावर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 63 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. सोनं आजही उच्चांकी किमतीपेक्षा 4714 रुपयांनी स्वस्त आजही सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,714 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. Home Loan सोबत सुरु करा SIP, लोन फिटेपर्यंत घराचे संपूर्ण पैसे रिकव्हर होतील चांदीच्या दरातही घसरण आज चांदीचा दर 57057 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 57904 प्रति किलो दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 847 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे. CNG Price Hike: महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, चेक करा नवे दर

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता?

    तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या