मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज घसरण; सोनं उच्चांकी किमतीपेक्षा आजही 4000 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज घसरण; सोनं उच्चांकी किमतीपेक्षा आजही 4000 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,020 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 16 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीला मंगळवारी ब्रेक लागला. गेल्या काही दिवसांत सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर या सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र यानंतर सोन्याचा भाव 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला. मंगळवारी सकाळी सराफा बाजार तीन दिवसांनंतर उघडला आणि सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 52180 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 52461 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 281 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. Sovereign Gold Bond: पुन्हा एकदा स्वस्त सोनं खरेदीची संधी, कुठे आणि कशी कराल गुंतवणूक? सोनं आजही उच्चांकी दराच्या तुलनेत 4000 रुपयांनी स्वस्त सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,020 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. Multibagger Share: 9 रुपयांचा शेअर 3700 रुपयांवर, गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 4 कोटी
 चांदीचा भाव 447 रुपयांनी घसरला
आज चांदीचा दर प्रति किलो 57905 रुपये इतका खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58352 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 447 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

पुढील बातम्या