Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला; तपासा आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला; तपासा आजचा लेटेस्ट रेट

आठवड्याच्या सुरुवातील सोमवारी सोने दरात घसरण पाहायला मिळाली. सोने दरात मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे.

  नवी दिल्ली, 10 जानेवारी : आठवड्याच्या सुरुवातील सोमवारी सोने दरात घसरण पाहायला मिळाली. सोने दरात मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. आज सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दरात 0.18 टक्क्यांची घसरण झाली असून सोने दर 47,365 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव 0.36 टक्क्यांनी कमी झाला असून चांदीचा दर 60,388 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मागील काही दिवसांपासून सोने दर काहीसा कमी होताना दिसून असून 47,200 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकता असा अंदाज आहे. पॉलिसी बाजार डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 24 कॅरेट शुद्धतेचा सोन्याचा दर 5101 रुपये प्रति ग्रॅम होता, जो आज 5100 रुपये झाला आहे. Goodreturns.in नुसार, 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 4677 रुपये प्रति ग्रॅम आहे. काल हा दर 4676 रुपये प्रति होता. 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 51,020 रुपये आहे.

  हे वाचा - Sovereign Gold Bond:10 जानेवारीपासून स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी,काय आहे योजना

  अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक App बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App द्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या App मध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या App च्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

  हे वाचा - Digital Gold Price Today: डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करावी का? काय आहे फायदा?

  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

  पुढील बातम्या